Advertisement

मध्य रेल्वेकडून 20 आणि 21 जुलैच्या मध्यरात्री पॉवर ब्लॉक

या ब्लॉकमुळे कर्जत आणि ठाणे येथून जाणाऱ्या शेवटच्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेकडून 20 आणि 21 जुलैच्या मध्यरात्री पॉवर ब्लॉक
SHARES

मध्य रेल्वेने (Central Railway) शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक (power block) जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या मते, हा ब्लॉक विशेष पोर्टल बूम उभारण्यासाठी आणि 800 MT एअरड्रॉप रोड क्रेनचा वापर करून जुने अँकर काढून टाकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

ब्लॉकमुळे कर्जत (karjat) आणि ठाणे (Thane) येथून जाणाऱ्या शेवटच्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. मध्यरात्री 12.14ची कसारा लोकल या कालावधीत अंतिम लोकल म्हणून चालेल. या ब्लॉकचा सीएसएमटी (CSMT) आणि भायखळा (Byculla) दरम्यानच्या धीम्या आणि जलद मार्गांसह तसेच सीएसएमटी (CSMT) आणि वडाळा (wadala) दरम्यानच्या हार्बर मार्गासह सर्व मार्गांवर परिणाम होईल.

"रविवारी सकाळी 00:30 ते 04:30 या वेळेत ब्लॉकची वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रवाशांना त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे," असे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

ब्लॉकचा तपशील

ब्लॉकची तारीख ----20/21 जुलैची मध्यरात्र (शनिवार/रविवार रात्रीची वेळ)

ब्लॉकचा कालावधी: सकाळी 12.30 ते 04.30 (04:00 तास)

ब्लॉक विभाग ----

भायखळा आणि सीएसएमटी (CSMT) दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर (7वी लाईन आणि सीएसएमटी शंटिंग नेकसह)

वडाळा रोड आणि सीएसएमटी (CSMT) दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

या ब्लॉक कालावधीत भायखळा आणि सीएसएमटी (CSMT) दरम्यान मुख्य मार्गावर आणि वडाळा रोड आणि हार्बर (Harbour) मार्गावर सीएसएमटी दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

ब्लॉक कालावधीत भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याण स्थानकांवरील मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा कमी केल्या जातील.

तसेच हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकापर्यंत सुरू राहील.

सीएसएमटीहून (CSMT) डाऊन धीम्या मार्गावरील शेवटची लोकल 12.14 ची कसारा लोकल असेल.

कल्याणहून अप धीम्या मार्गावरील सीएसएमटीसाठी शेवटची लोकल रात्री 10:34 वाजता असेल.

सीएसएमटीहून (CSMT) डाऊन फास्ट मार्गावरील पहिली लोकल पहाटे 04.47 वाजता कर्जतसाठी असेल.

अप धीम्या मार्गावरील सीएसएमटीसाठी (CSMT) पहिली लोकल ठाण्याहून पहाटे 04:00 वाजता असेल.

सीएसएमटीहून (CSMT) डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल सकाळी 12.13 ची पनवेल लोकल असेल.

अप हार्बर मार्गावरील सीएसएमटीसाठी (CSMT) शेवटची लोकल पनवेलहून रात्री 10.46 ची लोकल असेल.

सीएसएमटीहून (CSMT) डाऊन हार्बरवर पहिली लोकल पहाटे 04:52 पनवेल लोकल असेल. तसेच वांद्रेहून अप हार्बर मार्गावर सीएसएमटीसाठी पहिली लोकल पहाटे 04:17 ची लोकल असेल.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन

12870 हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस

11058 अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेस

12052 मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस

22120 मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस

11020 भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस

12810 हावडा-सीएसएमटी मेल



हेही वाचा

दादर स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्मवरून दोन्ही बाजूने चढता उतरता येणार

सिडको बामणडोंगरी गृहनिर्माण प्रकल्पातील दुकानांसाठी पुन्हा ई-लिलाव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा