Advertisement

सीएसएमटी स्थानकात बफरवर आदळली लोकल

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर धीम्या लोकलचे ब्रेक कार्यान्वित न झाल्यामुळं लोकल बफरवर आदळली आहे.

सीएसएमटी स्थानकात बफरवर आदळली लोकल
SHARES

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर धीम्या लोकलचे ब्रेक कार्यान्वित न झाल्यामुळं लोकल बफरवर आदळली आहे. यावेळी सुदैवानं मोटारमननं आपत्कालीन ब्रेक कार्यान्वित केल्यानं मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही आहे. याआधीही सीएसएमटी स्थानकात अशी घटना घडली होती.

धीमी लोकल

सीएसएमटी स्थानकात शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास धीमी लोकल सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आली. लोकल प्लॅटफॉर्मवर दाखल झाल्यानंतर प्रवासी उतरले. मात्र काहीच सेकंदाच्या अंतरानंतर लोकल बफरवर आदळली.

चौकशीचे आदेश

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बलासह, रेल्वे पोलीस घटना स्थळी पोहचले. त्यानंतर प्लॅटफॉर्म ३ वरून सर्व वाहतूक बंद करण्यात आली. तसंच, बफरवर आदळलेली लोकल कुर्ला कारशेडमध्ये पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणी मध्य रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत.



हेही वाचा -

दहावी फेरपरीक्षा निकाल जाहीर, २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

येणार १०० रुपयांची चमकणारी नोट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा