Advertisement

मध्य रेल्वे प्रवाशांच्या करमणुकीसाठी लवकरच 'ही' सुविधा उपलब्ध करणार

मुंबईची लाइफलाइन लोकल सेवेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

मध्य रेल्वे प्रवाशांच्या करमणुकीसाठी लवकरच 'ही' सुविधा उपलब्ध करणार
SHARES

मुंबईची लाइफलाइन लोकल सेवेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लोकल प्रवासावेळी विनाअडथळा करमणुकीची सुविधा मिळणार आहे. ‘कंटेंट ऑन डिमांड’अंर्तगत रेल्वेच्या डब्यात ‘मीडिया सव्‍‌र्हर’ बसविला जाणार असून मोबाइलवर विनाअडथळा करमणुकीचा आनंद लुटता येईल. ही सुविधा जुलै २०२१ अखेर पासून लोकल प्रवाशांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेला यामधून वर्षांला १ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार आहे. रेल्वेकडून याचे एका खासगी कंपनीला याचे काम देण्यात आले असून त्याची कुर्ला कारशेडमध्ये चाचणीही करण्यात आली आहे.

सध्या १६५ लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात असून यातील १० लोकलमध्ये करममुकीसाठी लागणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. अन्य लोकलमध्ये यंत्रणा बसवण्याचे काम सुरू असल्याचे समजतं. याकरिता एक मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात येत असून ते प्रवाशांना डाउनलोड करावे लागेल. लोकलमध्ये प्रवेश के ल्यानंतर या सेवेच्या कक्षेत येताच त्याद्वारे प्रवासी विना इंटरनेट विविध कार्यक्र मांचा आनंद घेऊ शकतील. अ‍ॅपच्या माध्यमातून आवडीचे चित्रपट, गाणी, मालिका, क्रिकेट सामने यासह अनेक करमणुकीच्या सुविधा मिळतील.

कोरोना काळात निर्बंध आल्यानंतर प्रवासी कमी झाले असले तरीही अनेकांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. मात्र आता या प्रवासात ठरावीक कार्यक्रम, चित्रपट, काही वाहिन्यांवरील कार्यक्रम प्रवाशांना मोबाइलवर विनाअडथळा आणि इंटरनेट न वापरता पाहता येतील. पुढील महिन्यापासून ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.




हेही वाचा

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत १६ जूनला विशेष लसीकरण सत्र

व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करताय? मग सावधान...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा