Advertisement

मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळेत बदल, पहा नवीन टाईमटेबल

खाली दिलेल्या तपशिलानुसार मध्य रेल्वेने काही उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळा बदलल्या आहेत

मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळेत बदल, पहा नवीन टाईमटेबल
(File Image)
SHARES

मध्य रेल्वेने काही उपनगरीय सेवांच्या वेळा बदलल्या आहेत. (Central railway local train timetable)

  • सीएसएमटीहून 05.04 वाजता सुटणारी ठाणे लोकल आता 05.00 वाजता सुटेल आणि 05.55 वाजता ठाण्याला पोहोचेल.
  • विद्याविहार येथून 05.39 वाजता सुटणारी कल्याण लोकल आता 05.34 वाजता सुटून कल्याणला 06.31 वाजता पोहोचेल.
  • सीएसएमटी 05.00 वाजता सुटणारी कसारा लोकल आता 05.07 वाजता सुटेल आणि कसारा येथे 07.46 वाजता पोहोचेल.
  • सीएसएमटीवरून 16.05 वाजता सुटणारी अंबरनाथ लोकल आता 16.08 वाजता सुटून अंबरनाथला 17.24 वाजता पोहोचेल.
  • सीएसएमटीवरून 16.10 वाजता सुटणारी कल्याण लोकल आता 16.11 वाजता सुटून कल्याणला 17.19 वाजता पोहोचेल.
  • सीएसएमटीवरून 16.17 वाजता सुटणारी आसनगाव लोकल ठाण्याला 16.55 ऐवजी 16.56 वाजता पोहोचेल.
  • ठाण्याहून 11.37 वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल आता 11.36 वाजता सुटेल आणि 12.34 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
  • कसारा येथून 10.13 वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल आता 10.18 वाजता सुटून सीएसएमटीला 12.40 वाजता पोहोचेल.
  • कर्जतहून 10.45 वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल (कोणताही बदल नाही) सीएसएमटी 12.40 ऐवजी 12.44 वाजता पोहोचेल
  • कल्याणहून 11.42 वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल आता 11.46 वाजता सुटून सीएसएमटीला 12.48 वाजता पोहोचेल.
  • अंबरनाथहून ११.३७ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल आता ११.३८ वाजता सुटून १२.५४ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
  • बदलापूरहून 11.23 वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल आता 11.25 वाजता सुटून सीएसएमटीला 13.19 वाजता पोहोचेल.

मुख्य मार्गासाठी उपनगरीय वेळापत्रकातील बदल https://www.cr.indianrailways.gov.in वर उपलब्ध आहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा