Advertisement

मुंबईत लोकल प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस अनिवार्य

लोकल प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची अट मागे घेण्यास कोर्टात नकार दिला आहे.

मुंबईत लोकल प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस अनिवार्य
SHARES

लोकल (Local Pass) प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची (Vaccination) अट मागे घेण्यास कोर्टात नकार दिला आहे. त्यामुळे लोकस प्रवासासाठी पूर्वीप्रमाणेच लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असणार आहे.

लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून जगातील सर्वच देशांनी लसीकरणावर मोठा भर दिला होता. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भारत थोपवू शकला आहे.

जास्तीत जास्त लसीकरण झाल्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव आणि वेदना जास्त जाणवल्या नाहीत. त्यामुळे लोकल प्रवासासाठीच्या लसीकरणाबाबतही राज्य सरकार सक्तीची भूमिका घेताना दिसत आहे.

महाराष्ट्रातही लसीकरणाचा टक्का अतिशय चांगला आहे. मात्र अद्याप शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालेले नाही. महाराष्ट्रतील शाळा पुन्हा सुरू झाल्यानं शासन विद्यार्थ्याचेही लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देत आहे.

लोकांनीही जागृतने चांगला प्रतिसाद दिल्यास महाराष्ट्रही लवकरच शंभर टक्के लसीकरण पूर्ण करेल, असा विश्वास आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. जेवढ्या लवकर लसीकरण पूर्ण होईल, तेवढ्या लवकर परिस्थिती अधिक सुधारत जाणार आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानं राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स १०० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने हॉटेल्स, सिनेमा आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यासोबतच पर्यटन आणि धार्मिकस्थळेही पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाट्य, सिनेमासह पर्यटन आणि हॉटेल व्यवसायालाही मोठा दिलासा मिळाला आहे. इतर जिल्ह्यात हॉटेल, सिनेमा आणि नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे.



हेही वाचा

औरंगाबाद-दिल्ली-मुंबई विमान सेवा पूर्ववत

'मेट्रो २ अ', 'मेट्रो ७' मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा