Advertisement

CSMT-Kudal अनारक्षित गणपती विशेष गाडी धावणार

गणपतीसाठी गावी जाणार्‍यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर ही गाडी धावणार आहे.

CSMT-Kudal अनारक्षित गणपती विशेष गाडी धावणार
SHARES

कोकण रेल्वे मार्गावर  गणपतीसाठी गावी जाणार्‍यांसाठी CSMT-Kudal अनारक्षित विशेष गाडी धावणार आहे. 4 आणि 6 सप्टेंबर दिवशी सीएसएमटी वरून तर कुडाळ वरून 5 आणि 7 सप्टेंबर दिवशी ही अनारक्षित गाडी धावणार आहे.

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामाठे, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. 

नुकतीच, कोकणामध्ये जाण्यासाठी पश्चिम रेल्वे (WR) मार्गावरूनही ट्रेन धावणार आहे. 29 ऑगस्टपासून या नव्या ट्रेनची सुरूवात झाली आहे.

मुंबई मधील पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनल्स (Bandra Terminus) ते गोव्याचे मडगाव (Madgoan) पर्यंत ही ट्रेन धावणार आहे. त्यामुळे आता कोकणात मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणार्‍या प्रवाशांना फायदा होणार आहे. 7 सप्टेंबरला गणपतीच्या आगमनापूर्वी ही नवी ट्रेन आता प्रवाशांच्या सेवेत रेल्वेकडून दाखल करण्यात आली आहे. 

वांद्रे- मडगाव ट्रेन ही आठवड्यातून दोनदाच धावणार आहे. मडगाव मधून वांद्रे च्या दिशेने दर मंगळवार आणि गुरूवारी गाडी असेल जी मडगाव हून सकाळी 7.40 आणि वांद्रे इथे रात्री 11.40 वाजता पोहचणार आहे. तर वांद्रे स्थानकातून दर बुधवार आणि शुक्रवार गाडी असेल जी वांद्रे येथून सकाळी 6.50 ला सुटेल आणि मडगावला रात्री 10 वाजता पोहचेल.


हेही वाचा

MSRTC च्या संपामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची तारांबळ

बीकेसी ते बोईसर व्हाया ठाणे, विरार गाठा अवघ्या 36 मिनिटांत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा