देशात लाॅकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे देशातील संपूर्ण व्यवहार बंद असतील. भारतीय रेल्वेने ३ मे पर्यत रेल्वे सेवा बंद राहतील असं सांगितंल आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने रेल्वेने सर्व 39 लाख तिकीटं रद्द केली आहेत. प्रवाशांना रद्द केलेल्या तिकिटांचे पैसही लवकरच मिळणार आहेत.
याआधी 21 दिवसांचा लाॅकडाऊन होता. हा लाॅकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता. यावेळी रेल्वे प्रशासनाने तिकीट बुक करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर अनेक प्रवाशांनी १४ तारखेनंतरची तिकीटं काढून ठेवली होती. पण आता लाॅकडाऊनचा कालावधी वाढवून 3 मे पर्यंत केला आहे. त्यामुळे रेल्वेने १५ एप्रिल ते ३ मे २०२० या काळात बुक करण्यात आलेली सर्व तिकीटं रद्द केली आहेत. या रद्द झालेल्या तिकिटांचे पूर्ण पैसे प्रवाशांना परत मिळतील असं आयआरटीसीने सांगितलं आहेत. आयआरटीसीने सांगितलं आहे की, ज्यांनी ऑनलाईन तिकीटबुक केले आहेत त्यांना ते रद्द करण्याची गरज नाही. ही तिकीटे स्वत:हुन रद्द होतील.
ज्या खात्यातून किंवा कार्डच्या माध्यमातून तिकीट बुक केले आहेत त्याच खात्यात किंवा कार्डवर प्रवाशांना पैसे परत मिळणार आहेत. रेल्वेने १५ एप्रिल ते ३ मे याकाळात बुक केलेली ३९ लाख तिकिटे रद्द केली आहेत. ज्या प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट बुक केले आहेत ते प्रवासी ३१ जुलैपर्यंत पैसे परत घेऊ शकतील.
हेही वाचा -