Advertisement

बदलापूर लोकलच्या मालडब्याला आग


SHARES

ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या बदलापूर लोकलच्या मालडब्याला घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान साडेआठच्या दरम्यान आग लागली. ऐन गर्दीच्या वेळेस ही आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गडबड उडाली. मालडब्यातून धूर येऊ लागताच प्रवाशांच्या आरडाओरडीनंतर ही लोकल घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान थांबवण्यात आली.

मोटरमनने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आगीची माहिती दिल्यावर बचाव पथकाने त्वरीत या ठिकाणी धाव घेत ही आग विझवली. या आगीत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. ही आग मालडब्यातील वायर्सच्या स्पार्किंगमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

या आगीच्या घटनेमुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक कोलमडली असून लोकलच्या एकापाठोपाठ एक रांगा लागल्या होत्या. यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस रेल्वे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा