Advertisement

बेस्टला येताहेत 'अच्छे दिन'


बेस्टला येताहेत 'अच्छे दिन'
SHARES

अार्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला अाता 'अच्छे दिन' येत अाहेत. गेले अनेक वर्ष अार्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे बेस्टची कोंडी झाली होती. पण ही कोंडी हळूहळू सुटत असल्याचं बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितलं अाहे.


वाहतूक विभागातून दिवसाला 3.10 कोटींचा नफा

वाहतूक विभागातून बेस्टला दिवसाला 3.10 कोटी रुपयांचा फायदा होत आहे. याआधी दिवसाला 2.60 कोटी रुपयांपासून ते 2.75 कोटी रुपयांपर्यंतच बेस्टची मजल जात होती. अाता दिवसाला प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली अाहे. दिवसाला जवळपास 30 लाख प्रवासी प्रवास करत अाहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे.


टॅक्सी, रिक्षाचे प्रवासी वळले बेस्टकडे

प्रत्येकानं बेस्टला पाच प्रवासी द्यावेत, अशी विनंती अाम्ही बेस्ट कर्मचाऱ्यांना केली होती. तसंच मेगाफोनचा वापर करू लागल्यामुळे टॅक्सी अाणि रिक्षाचे प्रवासी अाता बेस्टकडे वळू लागले अाहेत. त्यामुळे बेस्टला फायदा होत अाहे, असं बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी यांनी सांगितलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा