Advertisement

ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत!

स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झालेलं पाहायला मिळत आहे.

ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत!
Representative Image
SHARES

ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. बोरिवली स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक उशिराने सुरु असल्याचं पश्चिम रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगण्यात आलं आहे.

ओव्हरहेड वायर तुटल्याने बोरिवली स्टेशनवरील 1 आणि 2 प्लॅटफॉर्मवरील वाहतूक ठप्प झाली आहे. .त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा, विरार रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झालेलं पाहायला मिळत आहे. 

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, "बोरिवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरुन रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी ओव्हर हेड वायरमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. पॉइंट क्रमांक 107/108, पॉइंट क्रमांक 111/112 आणि पॉइंट क्रमांक 131/132 दरम्यानची ओव्हरहेड वायर कापली गेली आहे. बोरिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3,4,5,6,7 आणि 8 वरुन रेल्वे वाहतूक सुरु आहे." पश्चिम रेल्वेकडून बोरिवली स्थानकातील पॉइंट क्रमांक 107,108 आणि 111 च्या दुरुस्तीचं काम सुरु असून वाहतूक पूर्वव्रत करण्याला प्रथम प्राधान्य आहे, असं पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

Advertisement




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा