Advertisement

सोमवारपासून सामान्यांसाठी एसटीची सेवा पूर्ववत

सोमवारपासून सामान्यांसाठीही एसटीची सेवा पूर्ववत होत आहे. काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल होत असल्यानं एसटीनं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातही जाता येणं शक्य होणार आहे.

सोमवारपासून सामान्यांसाठी एसटीची सेवा पूर्ववत
SHARES

मुंबईसह राज्यभरात (maharashtra) कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होतोय तसतसा लॉकडाऊनमध्ये राज्य सरकार शिथिलता आणत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी वगळता एसटीची राज्यातील सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच होती. आता सोमवारपासून सामान्यांसाठीही एसटीची सेवा पूर्ववत होत आहे. काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल होत असल्यानं एसटीनं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातही जाता येणं शक्य होणार आहे.

राज्याची ५ स्तरांमध्ये विभागणी करतानाच कोरोनाचे (coronavirus) निर्बंध शिथिल केले आहेत. यात पहिल्या ४ ही स्तरांत मोडणाऱ्या जिल्ह्यात प्रवास ई-पासशिवाय करता येणार आहे. दुसरी लाट सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या ओसरू लागली. त्यातच लॉकडाऊनचे नियम कठोर करतानाच प्रवासावरही निर्बंध आले. एसटीची जिल्हा ते जिल्हा सेवा बंदच राहिली. तर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी एसटी चालवण्यात आल्या.

एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्न कमी झाले. सध्या राज्यात एसटीतून दररोज १० हजारच प्रवासी प्रवास करू लागले आणि ३० ते ४० लाख रुपये उत्पन्न मिळू लागले. सोमवारपासून राज्यातील निर्बंध शिथिल होत असल्याने एसटी महामंडळाला काहीसा दिलासा मिळणार आहे.

Advertisement

राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी करताना पहिल्या स्तरातील नागपूर, अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, यवतमाळमध्ये सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. दुसऱ्या स्तरातील हिंगोली, नंदुरबारमध्येही निर्बंध शिथिल के ले आहेत. तिसऱ्या व चौथ्या स्तरातील जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेनं वाहतूक सुरू राहील. या चारही स्तरांत जिल्हा ते जिल्हा प्रवासही करता येणार आहे. पाचव्या स्तरात मोडणाऱ्या जिल्ह्यात निर्बंध कठोर असल्याने अन्य जिल्ह्य़ातून येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक असणार आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे एसटीच्या लांब पल्ल्याच्या व मध्यम पल्ल्याच्या गाड्यांचे ऑनलाइन आरक्षणही सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होईल. तोपर्यंत आगारात लांब पल्ल्याची एसटी उपलब्ध असल्यास गाडीतच प्रवाशांना वाहकाकडून तिकीट मिळेल. प्रवाशांची मागणी व गर्दी पाहूनच एसटी बसगाड्यांचे नियोजन केलं जाणार असून सरसकट सर्वच गाड्या सोडल्या जाणार नाही.

Advertisement



हेही वाचा - 

रविवारी मुंबईत ७९४ नवे रुग्ण; २० कोरोनाबधितांचा मृत्यू

बेस्ट १०० टक्के प्रवासी क्षमतेनं धावणार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा