Advertisement

दिल्लीला मागे टाकून मुंबई विमानतळाने मिळवला मोठा मान

जगातील पहिल्या तीन विमानतळांमध्ये समाविष्ट, जाणून घ्या

दिल्लीला मागे टाकून मुंबई विमानतळाने मिळवला मोठा मान
SHARES

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाने (मुंबई एअरपोर्ट) मोठी कामगिरी केली आहे. हवाई प्रवाशांना प्रगत सेवा देण्यासाठी एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) ने मुंबई विमानतळाला लेव्हल-5 मान्यता दिली आहे. ही मान्यता मिळवणारे मुंबई हे देशातील पहिले विमानतळ आहे.

तर जगभरातील केवळ दोन विमानतळांना ही मान्यता आहे. ACI ला मुंबई विमानतळाने ग्राहकांना विमानतळावर सर्वोत्कृष्ट सेवा देण्याच्या बाबतीत चाचणी उत्तीर्ण झाल्याचे आढळले आहे.

काऊन्सिलच्या म्हणण्यानुसार, मुंबई विमानतळाने प्रवाशांना समाधानी ठेवून आपल्या कामकाजात उच्चांक निर्माण केला आहे. या सन्मानाने विमानतळाचा जगातील सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत समावेश झाला आहे.

मोहिमेचा एक भाग म्हणून विमानतळावर ई-गेटवे बसवण्यात आले आहेत. मुंबई विमानतळाच्या या यशाबद्दल अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) चे संचालक जीत अदानी यांनी मुंबई विमानतळाला लेव्हल 5 मान्यता मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अदानी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) जगातील आघाडीच्या विमानतळांपैकी एक असल्याचा आनंद होत आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या देखरेखीची जबाबदारी अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडवर आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येसह विमानांची वाहतूक आणि मालवाहतूक यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 ते मार्च 2024 दरम्यान 5.2 कोटींहून अधिक लोकांनी मुंबई विमानतळावरून प्रवास केला.



हेही वाचा

लोकल मधून पडून मृत्यू झालेल्या तरूणाच्या पालकांना मिळणार नुकसान भरपाई

उरण-नेरुळ -बेलापूर रेल्वेवर फुकट्यांचा प्रवास

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा