Advertisement

ओपन डेक बसेस पर्यटकांसाठी ठरत आहेत 'मोस्ट फेवरेट'

बेस्टच्या पर्यटक बस गेटवे ऑफ इंडिया-मंत्रालय-मरीन ड्राइव्ह चर्चगेट-CSMT या मार्गावर धावतात.

ओपन डेक बसेस पर्यटकांसाठी ठरत आहेत 'मोस्ट फेवरेट'
SHARES

बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्टच्या (बेस्ट) ओपन-डेक बसेस पर्यटकांसाठी एक उत्तम आकर्षण ठरल्या आहेत. या विकेंडला त्यांच्या हेरिटेज ओपन-डेक टूरसाठी सर्व जागा बुक झाल्या होत्या.

आठवड्याच्या दिवसातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचं बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. बुधवार, ३ नोव्हेंबर रोजी ओपन-डेक बस सुरू झाल्यापासून त्यांनी १ लाखांपेक्षा जास्त कमावले आहेत. पर्यटक बस गेटवे ऑफ इंडिया-मंत्रालय-मरीन ड्राइव्ह चर्चगेट-CSMT या मार्गावर धावतात.

बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितलं की, वीकेंडला झालेल्या सहलींचे पूर्ण बुकिंग झाले होते आणि सर्व तिकिटे विकली गेली होती.

पर्यंटक ३२ सीटर वरच्या डेकला प्राधान्य देतात आणि त्यांना तिथून मुंबईचे चांगले दृश्य दिसते. ते मार्गासह शहरातील इतर प्रेक्षणीय स्थळे आणि देखावे देखील पाहू शकतात.

सूर्यास्ताचा आनंद लुटता येत असल्याने संध्याकाळच्या वेळेत सहलीला जाणंही ते पसंत करतात. बेस्टचा दुसरा मार्ग शुक्रवार, १२ नोव्हेंबर रोजी नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) इथून सुरू झाला आणि तो गिरगाव चौपाटी आणि परत NCPA पर्यंत गेला.

आगाऊ बुकिंग घेण्यासाठी आणि ऑनलाइन तिकिटे विकण्यासाठी बेस्टनं पोर्टल आणि अॅप्सशी करार केला आहे. या ओपन-डेक बसमध्ये आसन, वेळ आणि प्रवासाची तारीख निवडण्याचा पर्याय एखाद्या व्यक्तीकडे असतो. वरच्या डेकसाठी तिकिटाची किंमत १५० आणि खालच्या डेकसाठी ७५ रुपये आहे.



हेही वाचा

मुंबईहून केवळ ४५ मिनिटात पोहोचता येणार नवी मुंबईला

गाडी चालवताय पण पीयूसी नाही; होऊ शकतो १० हजारांचा दंड

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा