Advertisement

मुंबई : मध्य रेल्वेने रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात बदल

नवी मुंबई, डहाणू आणि रायगड मार्गावरील प्रवाशांसाठी ही ट्रेन सोईस्कर आहे.

मुंबई : मध्य रेल्वेने रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात बदल
SHARES

नवी मुंबई (navi mumbai), डहाणू (dahanu) आणि रायगड (raigad) मार्गावरील प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने बदल केला आहे. ही गाडी रोहा येथून 4.30 ऐवजी दुपारी 3.55 वाजता सुटेल आणि 20 जुलैपासून दररोज सायंकाळी 7.25 ऐवजी 6.50 वाजता दिवा येथे पोहोचेल.

30 सप्टेंबर 2023 रोजी मध्य रेल्वेने मध्य आणि कोकण रेल्वे (kokan railway) मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ऑक्टोबर 2023 पासून काही गाड्या नवीन वेळापत्रकानुसार धावू लागल्या.

त्यामुळे, मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 01348 रोहा (roha) -दिवा (diva) मेमू ही गाडी 4.15 ऐवजी दुपारी 4.30 वाजता चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, रोहा-दिवा मेमू 1 नोव्हेंबर 2023 पासून सुधारित वेळेनुसार धावत होती. तथापि, सुधारित वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची होती.

ही मेमू पनवेल येथे सातत्याने उशिरा येत असल्याने तेथील प्रवाशांना पुढील प्रवासासाठी विलंब होत होता. तसेच पनवेलहून (panvel) डहाणूकडे जाणारी मेमूही प्रवाशांना पकडता आली नाही. त्यामुळे रोहा (roha) -दिवा (diva) मेमूचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच दुपारी चार वाजता करावे, अशी विनंती प्रवाशांकडून करण्यात आली.

त्यानंतर प्रवाशांची मागणी मान्य करून ही मेमू 20 जुलैपासून रोहा येथून दुपारी 3.55 वाजता सुटेल आणि दिवा येथे सायंकाळी 7.25 ऐवजी 6.50 वाजता पोहोचेल.



हेही वाचा

मुंबईत खड्ड्यांच्या 6,000 हून अधिक तक्रारींची नोंद

दादर स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्मवरून दोन्ही बाजूने चढता उतरता येणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा