Advertisement

Mumbai local news: मुंबईत लोकलच्या डब्यात आढळला मृतदेह

धावत्या लोकलमध्ये या वृद्धाची हत्या झाल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

Mumbai local news: मुंबईत लोकलच्या डब्यात आढळला मृतदेह
SHARES

 मुंबईत लोकलच्या लगेज डब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये हा प्रकार घडला आहे. रेल्वे पोलिस (railway police) या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Mumbai Crime News). 

धावत्या लोकलच्या लगेज डब्यात एका 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला आहे. या वृद्धाची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते टिटवाळा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये या वृद्धाची हत्या झाल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. हत्या झालेल्या वृद्धाचे नाव बबन देशमुख असे आहे.  या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात देखील घेतल आहे.

बबन देशमुख हे आंबिवली येथे राहणारे आहेत. आंबिवली येथून लोकल पकडून ते काही कामानिमित्त कल्याणलाआले होते. काम आटपून ते पुन्हा आंबिवलीला घरी जाण्यासाठी निघाले. घरी जाण्यासाठी त्यांनी कल्याण रेल्वे स्थाकनातून टिटवाळाकडे जाणारी लोकल पकडली. 

देशमुख लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करत होते. मात्र, लोकलमध्ये चढतांना किंवा बसण्याच्या कारणावरून इथे वाद होऊन त्यांना मारहाण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असावा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळताच त्यांनी देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

देशमुख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिका रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आता ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झालीय हे पोलीस तपासानंतर समोर येईल.

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अंबरनाथ लोकलमध्ये वापरलेला कंडोम आढळून आला होता. एका प्रवाशाने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर देखील प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. 

 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा