मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. आता लवकरच लोकलमधील ही रेटारेटी कमी होणार आहे. कारण आता फेऱ्यांची संख्या वाढवणार असल्याचा दावा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. त्यामुळे आता दर तीन मिनिटांऐवजी अडीच मिनिटांनी लोकल मिळणार आहे.
लोकलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तीन्ही मार्गांवर लोकलना कवच प्रणालीबरोबरच कम्बाइन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सीबीटीसी यंत्रणा जोडली जाणार आहे. त्यामुळं दोन लोकलमधील अंतर 180 सेकंदावरुन 150 सेंकद म्हणजेच अडीच मिनिटांवर येणार आहे. ही यंत्रणा राबवणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रणालीविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, या नव्या प्रयोगामुळं मुंबईकरांना आता अडीच मिनिटांतच दुसरी लोकल मिळणार आहे. तसंच, लोकल फेऱ्यांची संख्यादेखील दुप्पटीने वाढणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर 1 ऑक्टोबरपासून 12 डब्यांच्या 10 गाड्यांचे रुपांतर 15 डब्यांत करण्यात येणार आहे. त्यामध्ये 12 फेऱ्यांची संख्याही वाढविली जाणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि अधिकाधिक प्रवाशांना वेळेत प्रवास करता येईल.
आता 15 डब्यांच्या एकूण 209 इतक्या फेऱ्या होणार आहेत. या लोकल अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेला धावणार आहेत. या वाढीव फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या 1394 वरून आता 1406 होईल.
हेही वाचा