Advertisement

मुंबई मेट्रो 2A आणि 7 मार्गावरील तिकिटांचे दर जाहीर, स्थानकांची यादी तपासा

सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत.

मुंबई मेट्रो 2A आणि 7 मार्गावरील तिकिटांचे दर जाहीर, स्थानकांची यादी तपासा
SHARES

मुंबई मेट्रोची लाईन 2A जी दहिसरला अंधेरी पश्चिम डीएन नगरला जोडते आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व ला जोडणारी लाईन 7 चे या वर्षी उदघाटन होण्याची शक्यता आहे. सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत.

2A मुंबई मेट्रो लाईन 18 किमी पेक्षा जास्त लांब आहे आणि त्यात 17 स्थानके आहेत. अंधेरी (पश्चिम), पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड (पश्चिम), एकसर, मंडपेश्वर, कांदरपाडा, अप्पर दहिसर आणि दहिसर (पूर्व), लोअर ओशिवरा, ओशिवरा, गोरेगाव (पश्चिम), वलणई, डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम), पहाडी एकसर, बोरिवली (पश्चिम) या स्थानकांचा समावेश आहे. 

दहिसर हे दोन्ही मार्गांसाठी सामायिक स्थानके असतील. त्यामुळे ज्यांना डीएन नगर आणि अंधेरी पूर्वेला जायचे आहे त्यांना इथेच मेट्रो बदली करावी लागेल. न्यू लिंक रोड आणि दहिसर पूर्व ते डीएन नगर दरम्यान रहदारी कमी करणे हे या मार्गाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मुंबई मेट्रो लाईन 7 ही 16.5 किमी लांबीची असून त्यात 13 स्थानके आहेत. गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी (पूर्व), गोरेगाव (पूर्व), आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान आणि ओवरीपाडा या स्थानकांचा यात समावेश आहे.  यात अंधेरीतील लाईन 1 आणि लाईन 6 च्या JVLR येथे लाईन 2A येथे इंटरचेंज असेल.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दोन मुंबई मेट्रो मार्गांसाठी तिकीट दर जाहीर केले आहेत. तिकिटांच्या किमती 10 आणि 50 रुपयांच्या दरम्यान असतील. किमती पूर्णपणे प्रवास केलेल्या अंतरावर आधारित आहेत.

0-3 किमी अंतरासाठी 10 रुपये

3-12 किमीसाठी 20 रुपये

12-18 किमीसाठी 30 रुपये

18-24 किमीसाठी 40 रुपये

24-30 किमीसाठी 50 रुपये 

या मार्गांच्या उभारणीसाठी 12,600 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा