मुंबईतल्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना वेळेत डबा पोहचवण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांनी आता लोकलप्रमाणे मेट्रोमध्येही लगेज असावा अशी मागणी केली आहे. मेट्रो 1 चे काम पूर्ण झाले तेव्हा बीकेसीतील एमएमआरडीच्या कार्यालयात जाऊन डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांची भेट घेऊन तिथल्या अधिकार्यांची भेट घेतली होती. याचसोबत मॅट्रोमध्ये लगेज डबा देण्याची मागणी केली होती.
या प्रकरणी सुभाष तळेकर यांना विचारले असता, आम्हाला मेट्रोमध्ये लगेज डबा हवा. मेट्रोच्या प्रोजेक्टचा अभ्यास करताना विदेशाच्या धर्तीवर अभ्यास केला गेला आणि विदेशात आहे तशी मेट्रो मुंबईत आणली गेली. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की मेट्रो आणताना केवळ मुंबईचाच विचार आणि अभ्यास करायला हवा होता. कारण, मूळात मुंबई ही कष्टकरी कामगारांची आणि छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांची आहे. ज्यांच्याकडे थोडे फार सामान आहे त्यांना प्रवेश दिला जातो. पण जास्त सामान असेल तर त्यांना प्रवेश दिला जात नाही. मग त्यांनी काय करायचे. असेही तळेकर म्हणाले.
तळेकर यांनी विनंती अर्जावर मांडलेली ही समस्या विचार करण्या सारखी असल्याचे तत्कालीन एमएमआरडी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच जेव्हा कधी मेट्रोचे डबे वाढतील तेव्हा विचार करू, असे ते पुढे म्हणाले.
हेही वाचा -