Advertisement

गर्दी नियोजनाची रेल्वे व राज्य सरकारची तयारी अपुरीच

लोकलमध्ये प्रवासी संख्या वाढत असून लोकल फेऱ्यांची संख्या अपूरी पडत आहे. तसंच, गर्दी नियोजनाची रेल्वे व राज्य सरकारची तयारी अपुरीच आहे.

गर्दी नियोजनाची रेल्वे व राज्य सरकारची तयारी अपुरीच
SHARES

लॉकडाऊनमुळं बंद असलेली मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा टप्प्याटप्प्यात सर्वासाठी खुली करण्यात येत आहे. परंतू, राज्य सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. परिणामी लोकलमध्ये प्रवासी संख्या वाढत असून लोकल फेऱ्यांची संख्या अपूरी पडत आहे. तसंच, गर्दी नियोजनाची रेल्वे व राज्य सरकारची तयारी अपुरीच आहे. त्यामुळं येत्या काळातही लोकल सर्वासाठी खुली झाल्यास गर्दी नियोजन करणार कसं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

राज्य सरकार व रेल्वेकडून कार्यालयीन वेळा बदलणं, स्थानकात मेट्रोसारखे स्वयंचलित दरवाजे, नवीन तिकीट प्रणाली याची तयारीही झालेली नाही. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देताना गर्दीच्या नियोजनाचा विचार झालेला नाही. रेल्वे व राज्य सरकारनं लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. दरम्यान, रेल्वे व राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका केली जात आहे. 

लोकल सर्वासाठी खुली करण्याचा विचार झाल्यास नियोजन व समन्वय असणं महत्त्वाचं आहे. लोकल फेऱ्या सुरू करणं, त्या वाढवणं, प्रवासी सुविधा याबाबत पश्चिम व मध्य रेल्वेला वारंवार रेल्वे बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. यामध्येही बराच वेळ जातो. त्यामुळं या दोन्ही विभागांसाठी मिळून एकच महामंडळ स्थापन करणे गरजेचं असल्याचं वाहतूकतज्ज्ञांचं मत आहे.



हेही वाचा -

Bigg Boss 14: मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवू- अमेय खोपकर

सर्वांसाठी सुरु होणार मुंबई लोकल?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा