Advertisement

जळगाव, भुसावळमार्गे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

1 जानेवारी 2025 पासून रेल्वेने नवीन वेळापत्रक जारी केले आहे.

जळगाव, भुसावळमार्गे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
SHARES

1 जानेवारी 2025 पासून रेल्वेने नवीन वेळापत्रक जारी केले आहे. त्यामध्ये 45 जळगाव (Jalgaon), भुसावळ मार्गे (Bhusawal) धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत अंशतः बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेची वेळ तपासूनच प्रवास करावा, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही.

भुसावळ विभागातील 32 पॅसेंजर, मेमू विशेष क्रमांक असलेल्या गाड्या नियमित क्रमांकासह नवीन वर्षापासून धावू लागल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने त्या गाड्यांची यादी प्रकाशित केली आहे. रेल्वेच्या ऑनलाइन सिस्टीमसह अॅपमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री रेल्वेच्या नवीन वेळांसह क्रमांक अद्ययावत झाले आहेत.

रेल्वेशी संलग्न असलेल्या रेल्वे अॅपवर प्रवाशांना या नवीन वेळांसह क्रमांक मिळवता येतील. तथापि, जे अॅप रेल्वेशी संलग्न नाहीत, अशा खासगी अॅपवर अपडेट माहिती मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा स्थानकावर जाऊन रेल्वेचे वेळापत्रक तपासावे.

कुठल्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत झाला आहे बदल ?

वेळेत बदल झालेल्या रेल्वे गाड्यांमध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे:

  • 11039 कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस
  • 12101 लोकमान्य टिळक-शालिमार एक्स्प्रेस
  • 12102 शालिमार-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस
  • 12106 गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस
  • 12129 पुणे-हावडा एक्स्प्रेस
  • 12130 हावडा-पुणे एक्स्प्रेस
  • 12145 लोकमान्य टिळक-पुरी एक्स्प्रेस
  • 12146 पुरी-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस
  • 12151 लोकमान्य टिळक-शालिमार एक्स्प्रेस
  • 12152 शालिमार-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस
  • 12221 पुणे-हावडा दुरंतो एक्स्प्रेस
  • 12261 मुंबई-हावडा दुरंतो एक्स्प्रेस
  • 12809 मुंबई-हावडा मेल
  • 12810 हावडा-मुंबई मेल
  • 12811 हटिया एक्स्प्रेस
  • 12812 हटिया-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस
  • 12833 अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस
  • 12844 अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस
  • 12843 पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस
  • 12850 पुणे-बिलासपुर एक्स्प्रेस
  • 13426 सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस
  • 13425 मालदा टाउन-सुरत एक्स्प्रेस
  • 12859/12860 गीतांजली एक्स्प्रेस
  • 12869 मुंबई-हावडा एक्स्प्रेस
  • 12870 हावडा-मुंबई एक्स्प्रेस
  • 12879/12880 भुवनेश्वर एक्स्प्रेस
  • 12905 पोरबंदर-शालिमार एक्स्प्रेस
  • 12906 शालिमार-पोरबंदर एक्स्प्रेस
  • 12993 गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस
  • 12994 पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस
  • 13426 सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस
  • 13425 मालदा टाउन-सुरत एक्स्प्रेस
  • 20821 पुणे संतरागाची एक्स्प्रेस
  • 20822 संतरागाची पुणे एक्स्प्रेस

या सर्व गाड्यांच्या वेळेत अंशतः बदल करण्यात आला आहे.

कुठे चेक कराल नवीन वेळापत्रक?

प्रवाशांनी नवीन वेळापत्रकातील बदल तपासण्यासाठी एसएमएस सेवा 139 किंवा वेबसाइट्स www.indianrail.gov.in किंवा www.trainenquiry या संकेतस्थळांचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.



हेही वाचा

वलसाड डबलडेकर फास्ट पॅसेंजर बंद होणार

कोकणातील 'या' तीन रेल्वे गाड्या ठाणे, दादरपर्यंतच धावणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा