परिवहन विभागाकडे टॅक्सी संघटनांची आधीच भाडेवाढ मागणी केली आहे. यावर अद्यापही निर्णय झाला नाही. पण भाडेवाढ न केल्यास टॅक्सी संघटना स्वत: १ जूनपासून भाडेवाढ करतील, असा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं दिला आहे.
२५ ऑगस्ट २०२१ ला प्रति किलोग्रॅम सीएनजीचा दर ५१ रुपये ९८ पैसे होता. दिवसेंदिवस या दरात वाढच होत आहे. हाच दर ७२ रुपये झाला होता. ३० एप्रिलपासून याच दरात चार रुपये वाढ झाली आणि नवा दर ७६ रुपये प्रतिकिलो झाला.
सातत्याने सीएनजी दरात होणाऱ्या वाढीमुळे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने याआधीच टॅक्सी भाडे वाढवण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे.
सीएनजीच्या दरात ३५ टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ असून त्यामुळे परिवहन विभागानं टॅक्सी दरात किमान पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे.
येत्या पंधरा दिवसांत भाडेवाढ न केल्यास त्यानंतर १ जून २०२२ पासून मुंबईत आम्ही स्वत:हून टॅक्सीचे नवे भाडे दर लागू करू, असा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा