मागील ८ मे पासून वाहतुकीसाठी बंद असलेला ठाणे-मुंब्रा बायपास रोड धोकादायक असल्याच्या कारणाने दुरुस्तीकरता बंद ठेवण्यात आला होता. मात्र, दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला. दरम्यान, या रास्त्याचं काम पूर्ण झालं असलं तरी जुने खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे एमएसआरडीसी आणि ठेकेदारांनी रस्त्याची दुरुस्ती केली की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय प्रवाशांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
ठाणे-मुंब्रा बायपास रोड दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र, दुरुस्तीच्या कामात ठाणे-मुंब्रा बायपास रोडवरील काहीसा रस्ता सोडला तर संपूर्ण रोडवर जुने खड्डे आहे तसेच आहेत. ठाणे-मुंब्रा बायपास रोडवरून वाहन वेगाने जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांना होत आहे. असं असताना या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. तरीही हा रस्ता वाहतुकीसाठी खुला का केला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.