मुंबईत बेस्ट बसमध्ये 1 रुपयात प्रवास करण्याचा विचार तुम्ही कधीच केला नसेल. पण हे खरे आहे. मुंबईतील बेस्ट बसचे लाइव्ह लोकेशन ट्रॅक करणे, तिकीट बुकिंग, पास बुकिंग आदी सुविधा देणार्या चलो अॅपच्या माध्यमातून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. प्रवास सुलभ करण्यासाठी बेस्टच्या पुढाकाराने चलो अॅपनं नवीन सुविधेचे अनावरण केले आहे.
याअंतर्गत बेस्टने आता सुपर सेव्हर योजना सुरू केली आहे. अॅपचा वापर करून तुम्हाला पैसेही वाचवता येणार आहेत. या अॅपच्या नवीन योजनेनुसार मुंबईकरांना फक्त 1 रुपयात बसने प्रवास करता येणार आहे. या सुपर सेव्हर ऑफरसह, तुम्हाला 7 दिवस, बस प्रवासाच्या 5 फेऱ्यांसाठी फक्त 1 रुपये तिकीट द्यावे लागेल.
ही ऑफर मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहे. जर तुम्ही रविवार 24 जुलै रोजी 1 रुपये भरून ही सेवा सुरू केली तर तुम्ही 30 जुलैपर्यंत 5 बस ट्रिप मोफत घेऊ शकता.
बसमध्ये प्रवास करताना तुम्ही हे तिकीट सक्रिय करू शकता.
तुम्हाला फक्त संबंधित कंडक्टरला लँडिंग पॉइंटची माहिती द्यावी लागेल, स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ई-तिकीट दिसेल.
फक्त चलो अॅप वापरणारे प्रवासीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हेही वाचा