उबेरने बुधवारी मुंबई (mumbai) आणि दिल्ली (delhi) एनसीआरसह 37 शहरांमध्ये किशोरवयीन मुलांसाठी एक नवीन श्रेणी सुरू केली आहे. अॅग्रीगेटर कॅब ऑपरेटरने सांगितले की ही श्रेणी 13 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि सोयीस्कर वाहतूक प्रदान करण्यासाठी डिझाइन केली आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या श्रेणीत जीपीएस ट्रॅकिंग, रिअल-टाइम राइड ट्रॅकिंग आणि इन-अॅप एमर्जन्सी बटण यासारखे कठोर सुरक्षा प्रोटोकॉल वापरण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या 13 ते 17 वयोगटातील मुलांनी बुक केलेल्या राइड्सवर पालक लक्ष ठेवू शकतात. ज्यामुळे पालकांना मुलांच्या राइडबाबत माहिती मिळू शकेल.
या श्रेणीत पालक मुलांचे खाते देखील सेट करू शकतात. ज्यामुळे पालक त्यांच्या मुलांच्या वतीने राइड्सची निवड करण्यास, त्यांच्या राइड्सचा मागोवा घेण्यास आणि तपशीलवार राइडची माहिती प्राप्त करू शकतात.
आमच्याद्वारे सुरू केलेल्या ग्राहक सर्वेक्षणानुसार 92% पालकांनी असे म्हटले आहे की त्यांचे किशोरवयीन मुले विश्वसार्ह वाहतूक पर्यायांच्या अभावामुळे प्रवास करू शकत नाहीत.
किमान 72% लोकांनी असे सूचित केले की, त्यांच्या किशोरवयीन मुलांसाठी वाहतूक पर्याय शोधताना सुरक्षितता ही महत्त्वाची बाब होती, असे उबेरच्या प्रवक्त्याने सांगितले.
वापराच्या बाबतीत, सर्वेक्षण केलेल्या 63% पालकांनी सांगितले की त्यांना त्यांच्या किशोरवयीन मुलांना शाळेनंतर खेळ आणि अभ्यास तसेच इतर गोष्टींकरिता नेण्यासाठी त्यांच्या कारचा वापर करावा लागतो. तर 61% पालकांनी सांगितले की त्यांना त्यांच्या मुलांच्या शाळेनंतरच्या कोचिंग क्लासेससाठीही असेच करावे लागते.
उबेर इंडिया आणि उबेर (uber) साउथ एशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंग म्हणाले, “भारतात किशोरवयीन मुले आणि त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या वाहतूक आव्हानांना आम्ही ओळखून आहोत.”
तसेच “उबर फॉर टीन्ससह (uber for teens), पालक विश्वास ठेवू शकतील अशी सेवा प्रदान करू जेणेकरून पालक मुलांच्या राईडबाबत निश्चिंत राहतील आणि मुलेही उबेर राईडचा आनंद घेऊ शकतील."
हेही वाचा