Advertisement

प.रे.वर नोव्हेंबरमध्ये १४.८१ कोटींचा दंड वसूल


प.रे.वर नोव्हेंबरमध्ये १४.८१ कोटींचा दंड वसूल
SHARES

लोकलने विनातिकीट प्रवास करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य करावं, असं प्रवासात आपण ऐकत असतो. रेल्वेने वारंवार सूचना करूनसुद्धा लोकलने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेनं या प्रवाशांच्या विरोधात नोव्हेंबर महिन्यात एक मोहिम राबवली होती. या मोहिमेत पश्चिम रेल्वेनं विनीतिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करत १४.८१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. 


१८८ दलालांवर कारवाई 

पश्चिम रेल्वेनं राबवलेल्या मेहिमेअंतर्गत विनातिकीट प्रवास करणाऱ्या २.९३ लाख जणांविरोधात कारवाई केली आहे. या कारवाईत पश्चिम रेल्वेने १४.८१ कोटीचा दंड वसून केला आहे. त्याशिवाय, स्थानकावर बसणाऱ्या २४५ भिकारी आणि ५२० अनधिकृत फेरीवाल्यांकडून दंड वसूल करण्यात आला असून नोव्हेंबर महिन्यात पश्चिम रेल्वेनं १८८ दलालांविरोधात कारवाई केली आहे. त्याचप्रमाणं, १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ४१ विद्यार्थ्यांना महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली.   



हेही वाचा - 

एमएमआरडीए, स्कोमीमधील वाद न्यायालयाच्या दारात

पश्चिम रेल्वेवर लावणार आणखी १६ सरकते जिने, ५ लिफ्ट




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा