लालबाग - लालबागमधल्या तेजुकाया मंडळानं यंदा बळीराजाच्या संकल्पनेवर आधारित देखावा सादर केलाय. यात बळीराजा सततच्या दुष्काळामुळे आणि भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे त्रासलेला आहे. शेतकरी आत्महत्या, स्त्रीभूण हत्या, भ्रष्टाचार, या गोष्टी देखाव्यात दर्शवण्यात आल्यात. तसंच जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, महाविद्यालयीन आणि अभियांत्रिकी विध्यार्थ्यांसाठी ग्रंथालय आदी उपक्रम राबविले जातात. बाप्पाची ही नयनरम्य, मनोहरी मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केलीय. मूर्तिकार राजन झाड यांनी ही मूर्ती साकारली आहे.