Advertisement

माहीम-वांद्रे दरम्यान शुक्रवार-शनिवार ब्लॉक

दोन्ही दिवसांमध्ये सुमारे 334 लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

माहीम-वांद्रे दरम्यान शुक्रवार-शनिवार ब्लॉक
SHARES

माहिम ते बांद्रा स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान उपनगरीय लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. दोन्ही दिवसांमध्ये सुमारे 334 लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

शुक्रवारी रात्री 10.23 नंतर चर्चगेट स्थानकातून सुटणाऱ्या सर्व डाऊन धिम्या आणि चर्चगेटच्या दिशेला येणाऱ्या अप धिम्या लोकल मुंबई सेंट्रल-सांताक्रुझ दरम्यान जलद मार्गावरून धावणार. परिणामी महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकात लोकल उपलब्ध नसणार आहे.

शनिवारी ब्लॉक दरम्यान चर्चगेट दादर दरम्यान जलद लोकल धावणार त्यामुळे शनिवार रात्री/रविवार सकाळी डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाइंदर बोरीवली करून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार. तर चर्चगेट विरार शेवटची लोकल शनिवारी रात्री 10.53 वाजता सुटणार आहे.

अप-डाऊन धिम्या मार्गावर शुक्रवारी रात्री 11 ते सकाळी 8.30, अप-डाउन जलद मार्गावर रात्री 12.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.


शुक्रवारी रात्री 10.23 नंतर चर्चगेट स्थानकातून सुटणाऱ्या सर्व धिम्या आणि चर्चगेटच्या दिशेला येणाऱ्या अप धिम्या लोकल मुंबई सेंट्रल-सांताक्रुझ दरम्यान जलद मार्गावरुन धावणार आहेत. त्यामुळं महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकात लोकल थांबणार नाहीत.  विरार स्थानकातून शेवटची लोकल रात्री 12.05 वाजता सुटणार

ब्लॉक दरम्यान चर्चगेट-दादर दरम्यान लोकल जलद मार्गावरुन धावणार आहेत. या कालावधीत गोरेगाव-बांद्रा दरम्यान लोकल हार्बर मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. तर, विरार-अंधेरी दरम्यान लोकल धिम्या-जलद मार्गावरुन धावणार आहेत. 

शनिवारी सकाळी 6.10 वाजता भाईंदर स्थानकातून पहिली चर्चगेट लोकल रवाना होणार आहे. ही लोकल सांताक्रझ ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरुन धावणार आहे. शनिवारी बोरीवली-चर्चगेट दरम्यान पहिली धीमी लोकल सकाळी 8.03 वाजता सुटणार आहे. चर्चगेट स्थानकातून पहिली जलद लोकल सकाळी 6.14 वाजता बोरीवलीकरता सुटणार आहे. चर्चगेट-विरार पहिली जलद लोकल सकाळी सव्वा सहा वाजता धावणार आहे. चर्चगेट-बोरीवली दरम्यान पहिली धीमी लोकल सकाळी 8.03 वाजता सुटणार आहे. 

अप डाउन धिम्या डाउन मार्गावर शनिवारी रात्री 11.30 ते सकाळी 9, अप जलद मार्गावर रात्री 11.30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान चर्चगेट-दादर दरम्यान जलद लोकल धावणार आहे. 

शनिवारी रात्री/रविवारी सकाळी डहाणू रोड, विरार, नालासोपारा,वसई रोड, भाईंदर, बोरीवलीहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार आहेत. चर्चगेट-विरार पहिली धीमी लोकल सकाळी 8.8 वाजता सुटेल. तर, रविवारी भाईंदर-चर्चगेट पहिली लोकल सकाळी 8.24 वाजता धावणार आहे. विरार-चर्चगेट पहिली जलद लोकल सकाळी 8.18 वाजता सुटणार असून चर्चगेट-विरार पहिली जलद लोकल सकाळी 9.03 वाजता सुटेल. 



हेही वाचा

13 ते 17 वयोगटातील मुलांसाठी उबेरची नवीन घोषणा

मुंबईत ई-बाईक्स टॅक्सींमुळे 10 हजार नोकऱ्या निर्माण होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा