राज्य (maharashtra) परिवहन महामंडळ हे तोट्यात असल्याची बातमी काही नवीन नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employee) अनेक मागण्या पूर्ण करण्यात शासन अपयशी ठरले आहे. त्यातच आता एसटी महामंडळासमोर अनेक आव्हानं उभी राहत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने ST तिकीटदरात वाढ केल्यानंतर प्रवासीसंख्येसह उत्पन्न वाढणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात मार्च महिन्यातील प्रवासी (passangers) संख्येत 63 लाखांची घट नोंदवण्यात आली आहे.
गेल्या मार्चच्या तुलनेत यंदा 600 नव्या गाड्या प्रवासी सेवेत धावत असतानाही प्रवाशांना आपलेसे करण्यात महामंडळाला यश आले असल्याचे चित्र आहे.
25 जानेवारीपासून एसटी भाडेवाढ लागू झाली. फेब्रुवारी महिन्यात प्रवासी संख्येवर कोणताही परिणाम झाला नाही. मार्च महिन्यामध्ये प्रवासी संख्येत रोज सरासरी दोन लाखांची घट नोंदवण्यात आली आहे.
एसटीच्या समांतर फेऱ्या, वाहतूक नियोजनाचा अभाव व प्रशासकीय अनास्था ही प्रमुख कारणे प्रवासी गळतीचे असल्याचे दिसून येत आहे. महामंडळाने मार्च 2024 मध्ये 12 कोटी 38 लाख प्रवाशांची वाहतूक केली. मार्च 2025 मध्ये हा आकडा 11 कोटी 75 लाखांपर्यंत खालावला आहे.
यंदाच्या मार्च महिन्यात 63 लाख प्रवासी कमी झाले आहे. भाडेवाढीनंतरही अपेक्षित महसूल महामंडळाला गाठता आला नाही. मागील वर्षी मार्च महिन्यात रोजचे उत्पन्न 24 कोटी होते. यंदा मार्च महिन्यात 27 कोटी रुपये झाले आहे.
15 टक्के भाडेवाढीनुसार 4 कोटींनी वाढणे अपेक्षित होते. मात्र प्रवासी घटल्याने सुमारे 3 कोटींची वाढ झाली आहे, असे महामंडळातील आकड्यांवरून स्पष्ट होते. गेल्या दीड महिना महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक रजेवर होते.
या कालावधीत प्रभारीवर एसटीचा कारभार सोपवण्यात आला. प्रभारींनी रोजच्या वाहतूक नियोजनात सहभाग नोंदवला नाही. प्रवासी वाढवण्याचे विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले नाही.
15 एप्रिल ते 15 जून हा एसटीचा गर्दीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. वर्षभरातील सर्वाधिक उत्पन्न या काळात महामंडळाला मिळते. शाळेच्या सुट्ट्यांमुळे बसगाड्यांची उपलब्धता आणि लग्नसराईमुळे यांमुळे मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात.
मात्र वाहतूक फेऱ्यांच्या अयोग्य नियोजनामुळे गर्दीच्या हंगामातील हक्काच्या महसूलावर पाणी सोडण्याची भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. ऐन गर्दीच्या हंगाम सुरू होत असताना प्रवासी संख्येतील घट सध्या एसटी महामंडळात चिंतेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा