Advertisement

श्रेयस कॉलनीचा 60 वर्षांचा वारसा


श्रेयस कॉलनीचा 60 वर्षांचा वारसा
SHARES

गोरेगाव - गोरेगाव पूर्वमधील आरे रोड येथील श्रेयस कॉलनीतल्या बाप्पाला 60 वर्षे पू्र्ण झाली आहेत. या निमित्त हे मंडळ हिरक महोत्सव साजरा करत आहे.गेली 60 वर्षे हे मंडळ 5 फुटांची गणपतीची सुबक मूर्ती बसवत आहे. गेली 60 वर्षे अगदी नित्यनियमाने हे मंडळ कार्यरत आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सारेच या उत्सवात सहभागी होतात. 60 वर्षानिमित्त सांस्कृतिक ,सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसंच महिलांसाठीही कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमासोबत सामाजिक उपक्रमही राबवण्यात येत आहेत.
डोळे तपासणी,आरोग्य शिबीर असे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा