Advertisement

मालाड पूर्वेकडील गटारांकडे पालिकेचे दुर्लक्ष


मालाड पूर्वेकडील गटारांकडे पालिकेचे दुर्लक्ष
SHARES

मालाड - मालाड पूर्वेकडील पश्चिम द्रतुगती महामार्गाखालील पादचारी मार्गावरील गटाराचे झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. तसेच या पादचारी मार्गावर गरज नसताना देखील बसण्यासाठी बाकडे बसवले आहेत. नागरिकांच्या पैशाचा अशाप्रकारे गैरवापर करण्यात आला असून उघडया गटाराकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलंय. रात्री अपरात्री या मार्गावरून गेल्यास काळोखात पडण्याची दाट शक्यता आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी पी उत्तर पालिका विभागाकडे तक्रार केलीय. मात्र संबंधित पालिका यंत्रणेने येथे गटारावर झडप बसवण्याचे आश्वासन देऊन याकडे कानाडोळा केला आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा