Advertisement

ठाणे : माजिवडा उड्डाणपूल 15 दिवस बंद

नाशिकला जाण्यासाठी असे असतील पर्यायी मार्ग

ठाणे : माजिवडा उड्डाणपूल 15 दिवस बंद
SHARES

माजिवडा उड्डाणपूल 15 दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईहून नाशिक अथवा गुजरातकडे जाणारी वाहतूक या पुलावरुन बंद असणार आहे. वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिला आहे. 

घोडबंदर भागात सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. माजीवडा मेट्रो स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर मेट्रोचे छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत. 20 एप्रिल दरम्यान मेट्रोचे हे काम चालणार आहे. मेट्रोच्या या कामामुळं ठाण्यात वाहतूकीत बदल करण्यात येणार आहेत. 

मेट्रोच्या छताचे काम 60 टनी मोबाइल क्रेनच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी ही क्रेन मुंबई, नाशिक, घोडबदंर, माजीवडा उड्डाणपुलावरील मुख्य वाहिनीवर ज्युपिटर चढणी या ठिकाणी उभी करून हे काम होणार आहे. त्यासाठी माजीवडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागणार आहे. 


हेही वाचा

मुंबईत प्रथमच अपंगत्व उपचारांसाठी रोबोटिक प्रणाली


मुंबईकडून घोडबंदर अथवा भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना विवियाना मॉल समोरील ब्रीज चढणीच्या सुरुवातीला दुभाजकाजवळ प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने ज्युपिटर हॉस्पिटल समोरील स्लीप रोडने जाऊन कापूरबावडी मार्गे इच्छीत स्थळी जातील. 

नाशिककडे जाणाऱ्या वाहनाही ब्रिज चढणीच्या सुरुवातीला प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यांनाही स्लीप रोडने जाऊन गोल्डन क्रॉसमार्गे पुढे जावे लागणार आहे. हे वाहतूक बदल 19 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. 



हेही वाचा

गोखले पूल ते गोल्ड स्पॉट जंक्शन दरम्यान नो एन्ट्री

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा