सतीश सबनीस मेमोरियल FIDE रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा 6 एप्रिल 2025 म्हणजेच रविवारी पार पडली.
बुद्धिबळ स्पर्धेच्या 7 व्या आवृत्तीचा वांद्रे येथील उत्तर भारतीय हॉल येथे समारोप झाला. यामध्ये जवळपास 270 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात अव्वल मानांकित FIDE मास्टर सुयोग वाघ यांचा देखील सहभाग होता.
181 आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू होते ज्यात 1 आंतरराष्ट्रीय मास्टर, 7 FIDE मास्टर आणि 1 महिला FIDE मास्टर होते.
11व्या मानांकित पारस भोईरने अव्वल मानांकित FIDE मास्टर सुयोग वाघचा पराभव केला आणि चॅम्पियन पद पत्कारले.
सुयोगने Black Pieces ची निवड केली होती. त्याने एक मजबूत बचावात्मक सिसिलियन बचाव निवडला. पण एक चुकिची चाल त्याला भारी पडली. मात्र वेदांत पारसने पोझिशनचा फायदा घेत आरामात गेम जिंकून जेतेपद पटकावले.
दुसऱ्या बोर्डावर टाटा स्टीलचा निवडक विद्यार्थी आणि MSDCA चा खेळाडू FIDE वेदांत पानेसरने दक्ष जैनचा पराभव केला.
तिसऱ्या बोर्डावर पुष्कर डेरेने गुरू प्रकाश विरुद्ध विजय मिळवून त्याचे गुण 8 केले.
उत्तम टाय ब्रेकवर पुष्कर दुसरा आणि FIDE मास्टर वेदांत पानेसर यानंतर दुसरा आला.
ही स्पर्धा विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती. एकूण 3 लाखांहून अधिक रक्कमेची बक्षिसे वितरीत करण्यात आली. मुंबईतील वांद्रे येथील उत्तर भारतीय सेवा संघाच्या सभागृहात ही स्पर्धा पार पडली.
हेही वाचा