बोरिवली - चामुंडा सर्कलच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात कलासिद्धी २०१६ च्या वतीनं चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. सोमवारपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. अनेक प्रकारची पेंटिंग या प्रदर्शनातून मांडण्यात आली. या प्रदर्शनात अरुण आंबेकर, अनिल लोंढे, अनिश वाकडे, अंजली राजू, बालकृष्ण गिरकर, चंद्रशेकर बर्वे, दीपाली परब, प्रसन्ना चुरी, रेखा भिवंडीकर, शुभा सामंत, सुनील पुजारी, विवेक केळुस्कर आणि विजय लक्ष्मी यांनी काढलेली चित्रं प्रदर्शनात मांडली होती.