Advertisement

मुलुंडमध्ये नौदलाचे प्रदर्शन


मुलुंडमध्ये नौदलाचे प्रदर्शन
SHARES

मुलुंड - सामान्य नागरिकांना अधिक माहिती मिळावी यासाठी मुलुंडमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आले. महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय नौदलाचे रेअर अॅडमिरल आणि फ्लॅग ऑफिसर, महाराष्ट्र एरिया कमांडर सतीश घोरमाडे तसेच भारतीय नौदलाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी "छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही फादर ऑफ इंडियन नेव्ही मानतो आणि तेच आमचे प्रेरणास्थान आहेत", असे म्हणून सतीश घोरमाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. भारतीय नौदलाचे जहाज, पाणबुड्या, हेलिकॉप्टर, युद्धनौका यांच्या प्रतिकृती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या होत्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा