Advertisement

सुशांतचं 'हे' अर्धवट स्वप्न होणार पूर्ण, टीम घेणार जबाबदारी

सुशांतच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन वेबसाइटची लिंक शेअर देखील करण्यात आली आहे.

सुशांतचं 'हे' अर्धवट स्वप्न होणार पूर्ण, टीम घेणार जबाबदारी
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जूनला आत्महत्या केली. त्यानं उचलेलं हे टोकाचं पाऊल सर्वांसाठी धक्कादायक होतं. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अजूनपर्यंत समजू शकलं नाही. पण अनेकांनी बॉलिवूडची घराणेशाही यास जबाबदार असल्याचं बोललं आहे. यावरून सध्या बॉलिवूडमध्ये दोन गट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या टीमनं अभिनेत्याची मते आणि कल्पना शेअर करण्यासाठी सेल्फमुसिंग डॉट कॉम (selfmusing.com) ही वेबसाइट सुरू केली आहे. सेल्फ मुसिंग हे त्याचं स्वप्न होतं, अशी माहिती त्याच्या टीमनं दिली. सुशांतच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन वेबसाइटची लिंक शेअर देखील करण्यात आली आहे.


लिंक शेअर करताना टीमनं लिहिलं आहे की, 'तो आमच्यापासून दूर गेला परंतु अद्याप तो आपल्यामध्ये जिवंत आहे. #सेल्फम्युजिंग सुरू करीत आहोत. आपल्यासारखे चाहते सुशांतचे खरे "गॉडफादर" होते. त्याला वचन दिलं होतं त्यानुसार त्याचे सर्व विचार, शिकवण, स्वप्नं आणि इच्छांमध्ये रूपांतर करत आहे. त्याच्यातील सकारात्मक उर्जा आम्ही येथे येऊन येत आहोत.

सुशांतच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता की नाही? या दिशेनं देखील तपास करण्यात येणार आहे. सध्या पोलिस अनेकांची चौकशी करत आहे.

दरम्यान करण जोहर, सलमान खान, एकता कपूर, संजय लीला भन्साळी यांच्यासह आठ जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी बिहारमधील मुझफरपूर येथील पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.



हेही वाचा

बॉलिवूडमधील घराणेशाही विरोधात ऑनलाईन मोहीम

सुशांत सिंह आत्महत्या : करण जोहर, सलमान खानसह ८ जणांविरोधात तक्रार दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा