Advertisement

६ महिन्यानंतर अक्षयकुमारसाठी ‘गोल्ड’न मोमेंट!

'स्कोर ट्रेंड्स इंडिया'च्या माहितीनुसार, अक्षयकुमार ८१ गुणांसह सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. दबंग खान ६९ गुणांसह दुसऱ्या स्थानी आणि अमिताभ बच्चन ६७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. किंग खान ३७ गुणांसह चौथ्या स्थानी, तर संजय दत्त ३२ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

६ महिन्यानंतर अक्षयकुमारसाठी ‘गोल्ड’न मोमेंट!
SHARES

फेब्रुवारी माहिन्यात रिलीज झालेल्या ‘पॅडमॅन’ चित्रपटामुळे अक्षय कुमार स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला होता. त्यानंतरचे ६ महिने या चार्टवर सलमान खानने अधिराज्य गाजवलं. त्यानंतर पुन्हा एकदा या खिलाडीने बाजी मारली आहे.


लोकप्रियतेचे निकष

‘गोल्ड’ सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे अक्षय कुमार पुन्हा एकदा 'स्कोर ट्रेंड्स' इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनला आहे. अमेरिकेच्या स्कोर 'ट्रेंड्स इंडिया' या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी तयार केली आहे.


कोण, कुठल्या स्थानी

'स्कोर ट्रेंड्स इंडिया'च्या माहितीनुसार, अक्षयकुमार ८१ गुणांसह सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. दबंग खान ६९ गुणांसह दुसऱ्या स्थानी आणि अमिताभ बच्चन ६७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. किंग खान ३७ गुणांसह चौथ्या स्थानी, तर संजय दत्त ३२ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.



स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, ''जेव्हा जेव्हा अक्षयकुमारचा चित्रपट येतो, तेव्हा लोकप्रियतेमध्ये कोणी त्याला मागे टाकू शकत नाही, हे या गोष्टीवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ६ महिन्यांपूर्वी अक्षयकुमारचा ‘पॅडमॅन’ आला होता, तेव्हा संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात सर्वत्र अक्षयच दिसत होता. आता ‘गोल्ड’ चित्रपट रिलीज होत असल्याचा फायदा अक्षयला झाला आहे. ६ महिन्यांपासून जवळ जवळ प्रत्येक आठवड्यामध्ये नंबर वन असलेल्या सलमानला त्याने मागे टाकलं आहे.''


मराठीचाही फायदा

गेल्या महिन्यात अक्षयकुमार प्रस्तुत मराठी चित्रपट ‘चुंबक’ रिलीज झाला, तेव्हा मराठी मीडियासोबतच हिंदी मीडियामध्येही अक्षयच्या या मराठी सिनेमाची चर्चा होती. ‘गोल्ड’ सिनेमामुळे तर अक्षय फेसबुक, ट्विटर, वायरल न्यूज़, वृत्तपत्र आणि डिजिटल साइट्स सर्वत्र लोकप्रिय आहे.



हेही वाचा-

पत्त्याचा कोसळणारा डोलारा!

'ट्रॅजडी क्विन' मीना कुमारीला गुगलची आदरांजली



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा