Advertisement

अमिताभ थेट 'झुंड'च्या सेटवरून...

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'नाळ'मध्ये अभिनय करताना दिसलेला नागराज 'झुंड'मध्ये अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शित करत आहे. या सिनेमाच्या सेटवरून आलेला हा फोटो...

अमिताभ थेट 'झुंड'च्या सेटवरून...
SHARES

'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे मागील बऱ्याच दिवसांपासून 'झुंड' या हिंदी सिनेमाच्या कामात व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'नाळ'मध्ये अभिनय करताना दिसलेला नागराज 'झुंड'मध्ये अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शित करत आहे. या सिनेमाच्या सेटवरून आलेला हा फोटो...


'झुंड' बाबत गुप्तता

अमिताभ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'झुंड'चं चित्रीकरण नागपूरमध्ये सुरू आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू असलेल्या या शूटबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. अमिताभ यांच्याखेरीज इतर कोणत्याही कलाकाराची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. नागपूरमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून, पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू असल्याची माहिती 'झुंड'शी निगडीत असलेल्या सूत्रांकडून मिळाली आहे.




खांद्यावर विराजमान महानायक

नागराजचं दिग्दर्शन असल्यामुळे या सिनेमात अमिताभ नेमके कोणत्या रूपात समोर येतात याबाबत उत्सुकता वाढली आहे. सेटवरून आलेल्या पाठमोऱ्या फोटोमध्ये कलाकाराचा चेहरा दिसत नाही, पण असंख्य लोकांच्या झुंडीच्या खांद्यावर विराजमान झालेले हे महानायक अमिताभ बच्चनच आहेत हे वेगळं सांगण्याची गरज भासत नाही. त्यांच्या शैलीवरून ते पाहताक्षणीच लक्षात येतं. या फोटोसोबतच 'झुंड' २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.


महानायक वेगळ्याच भूमिकेत

या सिनेमात अमिताभ एका प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. गल्लीबोळातील मुलांना एकत्र करून ते एक फुटबॅाल टिम तयार करतात, असं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं. त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, पण या सिनेमात ते पूर्वीपेक्षा खूपच वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजतं. या सिनेमाची कथा नागपूरमध्ये घडणारी असल्याने तिथेच चित्रीकरणही करण्यात येत आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, किशन कुमार, राज हिरेमठ, सविता राज हिरेमठ, नागराज मंजुळे यांनी टी-सिरीज, तांडव एन्टरटेन्मेंट आणि आटपाटच्या बॅनरखाली केली आहे. 



हेही वाचा -

EXCLUSIVE : नायक नहीं 'खलनायक' हूं मैं : मंगेश देसाई

Movie Review : गोपाळरावांची जिद्द अन् आनंदीबाईंचा ध्यास



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा