Advertisement

'फ्राॅड सैंय्या'मध्ये दिसणार दीपाली पानसरे

मराठी कलाकारांची हिंदी चित्रपटातील झेप हा कायमच कौतुकाचा विषय आहे. त्यामुळेच आपला आवडता कलाकार हिंदी चित्रपटामध्ये कधी दिसणार याची उत्सुकता चाहत्यांनाही लागलेली असते. दिपाली पानसरेबाबत बोलायचं तर तिने 'हॅलो गंधे सर', 'आई तुझा आशीर्वाद', 'प्रेमासाठी, 'मोस्ट वाॅन्टेड' या मराठी चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत.

'फ्राॅड सैंय्या'मध्ये दिसणार दीपाली पानसरे
SHARES

प्रादेषिक भाषेतील चित्रपटांमधील कलाकारांना हिंदी चित्रपटात झळकण्याचे वेध लागलेले असतात. त्यासाठी काही जण आपणहून प्रयत्न करत असतात, तर काहींना हिंदीत काम करण्याची संधी चालून येते. यापूर्वीही हिंदीत काम केलेली अभिनेत्री दिपाली पानसरे पुन्हा हिंदीमध्ये दिसणार आहे.


हिंदी चित्रपटातील झेप

मराठी कलाकारांची हिंदी चित्रपटातील झेप हा कायमच कौतुकाचा विषय आहे. त्यामुळेच आपला आवडता कलाकार हिंदी चित्रपटामध्ये कधी दिसणार याची उत्सुकता चाहत्यांनाही लागलेली असते. दिपाली पानसरेबाबत बोलायचं तर तिने 'हॅलो गंधे सर', 'आई तुझा आशीर्वाद', 'प्रेमासाठी, 'मोस्ट वाॅन्टेड' या मराठी चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. आता प्रकाश झा प्राॅडक्सन्सची निर्मिती असलेल्या 'फ्राॅड सैंय्या' या हिंदी चित्रपटात ती दिसणार आहे. 


१८ जानेवारीला प्रदर्शित 

दिपालीची भूमिका असलेला 'फ्राॅड सैंय्या' १८ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सौरभ श्रीवास्तव दिग्दर्शित या चित्रपटात अर्शद वारसी आणि सारा लाॅरेन प्रमुख भूमिकेत असून, दीपाली या चित्रपटात सेकंड लीड आहे. यापूर्वी दीपालीने 'चाॅक अॅण्ड डस्टर ' या चित्रपटात शबाना आझमीच्या मुलीची भूमिका साकारली आहे. 


वास्तव घटनेवर 

'फ्राॅड सैंय्य्या' या चित्रपटात अर्शद वारसी एकाच वेळेस बऱ्याच युवतींना फसवत असल्याची गोष्ट आहे. हा चित्रपट एका वास्तव घटनेवर आधारित आहे. 'फ्राॅड सैंय्या' हा आपल्या करियरला कलाटणी देणारा असून भविष्यात मोठी झेप घेण्यासाठी पूरक असल्याचं मत बऱ्याच मराठी व हिंदी मालिकांमधून भूमिका साकारलेल्या दीपालीने व्यक्त केलं आहे.



हेही वाचा - 

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाची 'अफवाच'

श्रीदेवीची खुशी बाॅलीवूडच्या वाटेवर!




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा