Advertisement

ईशान-अनन्याची जमली जोडी

सिनेसृष्टीत प्रत्येक सिनेमागणिक नवनवीन जोड्या जुळत असतात. लवकरच एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही जोडी आहे ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची.

ईशान-अनन्याची जमली जोडी
SHARES

सिनेसृष्टीत प्रत्येक सिनेमागणिक नवनवीन जोड्या जुळत असतात. लवकरच एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही जोडी आहे ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची.


आॅनस्क्रीन जोडी

आजवर बऱ्याच कलाकारांनी जोड्यांच्या रूपात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. यात काही अभिनेता-अभिनेत्रींच्या रील लाईफमधील जोड्या नंतर रिअल लाईफमध्येही जुळल्या आणि ते एकमेकांचे लाईफ पार्टनर बनले. आता ईशान खट्टर आणि अनन्या पांडे ही नवी आॅनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वाह! लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकल्यानंतर 'उडता पंजाब', 'हाफ विडो', 'बिआँड द क्लाऊड्स' आणि 'धडक'मध्ये झळकलेला ईशान आता 'स्टुडंट आॅफ द ईयर २' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या अनन्यासोबत दिसणार आहे.


शूटिंग ११ सप्टेंबरपासून

'सुल्तान', 'टायगर झिंदा है' आणि 'भारत' या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणारे अली अब्बास झफर आणि झी स्टुडिओज यांची निर्मिती असलेल्या 'खाली पिली' या सिनेमासाठी ईशान आणि अनन्या एकत्र आले आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. मकबूल खान या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अली अब्बास झफर आणि झी स्टुडियोज यांच्या साथीनं हिमांशु मेहराही या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी आहेत. 'खाली पिली'चं शूटिंग ११ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, पुढल्या वर्षी जूनमध्ये सिनेमा रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. संगीतकार विशाल-शेखर या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवणार आहेत.


अभिनयाचं कौतुक 

'सैराट' या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक' या चित्रपटात ईशानची जोडी जान्हवी कपूरसोबत जमली होती. या चित्रपटातील ईशानच्या अभिनयाचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. अनन्यानंही 'स्टुडंट आॅफ द ईयर २' या चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारली होती. त्यामुळं या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल अशी निर्माता-दिग्दर्शकांना खात्री आहे, पण खरं काय ते सिनेमा रिलीज झाल्यावरच समजेल.



हेही वाचा  -

मांडवामध्ये 'बोले चुडिया'च्या सेटवर नवाजुद्दीन-कबीर भेट

'मोलकरीण बाई'मध्येही साजरा होणार गणेशोत्सव




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा