Advertisement

लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

प्रकृती बिघडल्याने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
SHARES

प्रकृती बिघडल्याने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

श्वासोच्छवास करण्यास त्रास होऊ लागल्याने लता मंगेशकर यांनी सोमवारी दुपारी ब्रीच कँडीत दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. २८ सप्टेंबर रोजी लतादीदींनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला आहे. रविवारीच लता मंगेशकर यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी सिनेमा 'पानीपत' मधील गोपिका बाईंची भूमिका निभावणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरे यांचा फर्स्ट लुक शेअर केला होता.

लता मंगेशकर यांनी ३६ प्रादेशिक आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांना भारत रत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासह त्यांचा आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे. 




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा