अजय देवगण याचा बहुप्रतीक्षित ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. संभाजी ब्रिगेडनं या चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. चित्रपटामधील काही दृष्ट्यांवर त्यांनी आक्षेप घेत त्यासंदर्भात स्पष्टीकरण मागितलं आहे.
ट्रेलरमधील एका शॉटमध्ये शिवाजी महाराजांवर कोणी साधू लाकूड फेकताना दाखवला आहे. ही व्यक्ती नक्की कोण आहे? आणि हा कोणता प्रसंग आहे? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केला आहे. चुकीचा इतिहास जनतेसमोर जावू नये अशी संभाजी ब्रिगेडची इच्छा आहे. संभाजी ब्रिगेडनं हे दृश्य वगळण्याची मागणी केली आहे. तसंच अभिनेत्री काजोलच्या तोंडी जे संवाद आहे तेही आक्षेपार्ह आहेत.
हेही वाचा