Advertisement

अयोध्येच्या राम मंदिर प्रकरणावर येणार चित्रपट

कंगना तिच्याच प्रोडक्शनद्वारे निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. कंगनानं 'मणिकर्णिका' नावानं एक प्रोडक्शन हाऊस सुरु केलं आहे. याद्वारे ती आता पहिला चित्रपट तयार करण्याच्या तयारीत आहे.

अयोध्येच्या राम मंदिर प्रकरणावर येणार चित्रपट
SHARES

अभिनेत्री कंगना रनौतनं मणिकर्णिका या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. आता ती आपल्या प्रोडक्शनद्वारे निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. कंगनानं 'मणिकर्णिका' नावानं एक प्रोडक्शन हाऊस सुरु केलं आहे. याद्वारे ती आता पहिला चित्रपट तयार करण्याच्या तयारीत आहे.

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, कंगना तिचा पहिला चित्रपट तयार करण्याची तयारी करतेय. हा चित्रपट अयोध्येच्या राम मंदिर प्रकरणावर आधारित आहे. चित्रपटाचं शीर्षक 'अपराजित अयोध्या' असं देण्यात आलं आहे. तिच्या नव्या चित्रपटाचं शूटिंग पुढील वर्षापासून सुरू होईल. चित्रपटाची स्क्रिप्ट केव्ही विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे.

याबाबत कंगना म्हणाली, 'राम मंदिराचा विषय गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. ८०च्या दशकात जन्म झाल्यावर मी अयोध्याचं नाव नकारात्मकरित्या ऐकतच मोठी झाली आहे. या प्रकरणानं भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलला. या निकालामुळे भारतातील शतकानुशतकांचा वाद थांबला आहे. एका व्यातीचा नास्तिकतेपासून आस्तिकतेपर्यंतचा प्रवास 'अपराजित अयोध्या'मध्ये दिसणार आहे. म्हणूनच मला वाटले की माझ्या प्रॉडक्शन हाऊससाठी हा सर्वात योग्य विषय असेल.'

९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या राम मंदिर प्रकरणावर निकाल दिला. कोर्टानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचा हवाला देत म्हटलं की, बाबरी मशीद कोणत्याही रिकाम्या जागेवर बांधलेली नाही. वादग्रस्त भूमीखाली एक रचना होती आणि ती इस्लामिक रचना अजिबात नव्हती



हेही वाचा

'या' कारणास्तव न्यायालयाचा गोविंदा आणि जॅकी श्रॉफला दंड

'या' तारखेला प्रदर्शित होणार हिना खानचा पहिला चित्रपट


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा