कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उबर ही भाड्याने टॅक्सी सेवा देणारी कंपनी संकटात सापडली आहे. त्यामुळे उबरने मुंबईतील आपलं कार्यालय बंद केलं आहे. मुंबईतील कुर्ला येथील कार्यालय बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मात्र, मुंबईतील टॅक्सी सेवा सुरूच राहणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका उबरला बसला आहे. त्यामुळे उबरने जगभरातील आपली ४५ कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उबरने आपलं मुंबईतील कुर्ला येथील कार्यालय बंद केलं आहे. गुरुग्राम येथील मुख्य कार्यालयांतर्गत हे पश्चिम क्षेत्रातील कंपनीचे विभागीय कार्यालय होते. मुंबईतील कार्यालयात २५ कायमस्वरूपी आणि १५० हून अधिक कंत्राटी कामगार होते. मात्र मुंबईतील टॅक्सी सेवा सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे यातील काही कर्मचाऱ्यांना कंपनी सोबत घेऊन काम करणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोसरवासाई यांनी मेमध्ये कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात जगभरातील उबरची ४५ कार्यालये बंद केली जाणार असल्याची माहिती दिली होती. कंपनीचे सिंगापूर येथील कार्यालयही बंद करण्यात आलं आहे. उबर इंडियाचे मुख्य म्हणून प्रदीप परमेश्वरन यांची जूनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. उबरने यापूर्वी ६७०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते. त्यात अनेक भारतीय कामगारांचाही समावेश होता.
हेही वाचा -
मुसळधार पावसामुळे मुंबईतील 'हे' रस्ते बंद
पीपीई कीटमध्येच डॉक्टर तरुणी थिरकली ‘हाय गर्मी’वर, पहा हा भन्नाट डान्स