Advertisement

क्रूड आॅईलने गाठला अडीच वर्षांतला उच्चांक, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?


क्रूड आॅईलने गाठला अडीच वर्षांतला उच्चांक, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?
SHARES

आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी क्रूड आईल अर्थात कच्च्या तेलाने अडीच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

ब्रेंट क्रूडच्या किंमती मंगळवारी ६५.७० डाॅलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. याअगोदर ब्रेंट क्रूडचे दर अडीच वर्षांपूर्वी म्हणजेच २४ जून २०१५ मध्ये प्रति बॅरल ६५ डाॅलरवर पोहोचले होते. परिणामी भारतीय तेल वितरण कंपन्यांना महागडं तेल विकत घेऊन ते चढ्या किंमतीने वितरीत करावं लागणार आहे.


६ महिन्यांत ४७ टक्के वाढ

जून २०१७ मध्ये ब्रेंट क्रूडची किंमत ४४.४८ डाॅलर एवढी होती. मात्र मागील ६ महिन्यांत त्यात ४७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वाढीमुळे आता देशातील आईल मार्केटींग कंपन्यांवरही पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याचा दबाव वाढत चालला आहे. परिणामी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे.


कुठल्या कारणाने दरवाढ?

तेल उत्पादन देशाच्या संघटने (ओपेक)ने तेलाच्या उत्पादनात घट केल्यामुळे बाजारात तेल पुरवठा कमी आणि मागणीत वाढ झाली आहे. सोबतच ब्रिटनच्या उत्तरेकडील सागरातून येणारी मुख्य तेलवाहिनी दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याने तेलाच्या पुरवठ्यात घट झाली आहे. या तेलवाहिनीतून दररोज ४ लाख ५० हजार बॅरल क्रूड आईल स्काटलँडच्या तेल प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा