मुलुंड - नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमधील मराठा भवन येथे शुक्रवारी मुलुंडकरांसाठी एका अनोखा कार्यक्रम झाला. कॅशलेस कसं व्हायचं, या संदर्भात जनकल्याण बँकेमार्फत एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी या वेळी मार्गदर्शन केलं.
कॅशलेस कसं व्हायचं? पॉकेटमनी म्हणजे काय? ऑनलाइन ट्रॅझॅक्शन करताना घ्यायची काळजी असे अनेक आर्थिक विषय सोप्या शब्दांत ठाकूर यांनी समजावून सांगितले. आपल्या देशात 40% अशिक्षित लोक आहेत आणि म्हणूनच उर्वरित 60% सुशिक्षित नागरिकांनी कॅशलेस होणं गरजेचं आहे. जेणेकरून त्या 40% लोकांसाठी कॅश उपलब्ध होऊ शकेल, असा महत्त्वाचा मुद्दा ठाकूर यांनी मांडला. नोटबंदीमुळे अनेक समज गैरसमज पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर असे उपक्रम राबवणं नक्कीच कौतुकास्पद असल्याचंही ठाकूर यांनी या वेळी नमूद केलं.