Advertisement

PF चे व्याजदर घटले, 'हा' आहे नवीन दर

पगारदार कर्मचाऱ्यांना यंदा भविष्य निर्वाह निधीवर (Employee Provident Fund- ईपीएफ) ०.१५ टक्के कमी परतावा मिळणार आहे.

PF चे व्याजदर घटले, 'हा' आहे नवीन दर
SHARES

पगारदार कर्मचाऱ्यांना यंदा भविष्य निर्वाह निधीवर (Employee Provident Fund- ईपीएफ) ०.१५ टक्के कमी परतावा मिळणार आहे.  भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees’ Provident Fund Organisation - ईपीएफओ) २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.५० टक्के व्याजदर (interest rate) घोषीत केला आहे. व्याजदर कमी झाल्याने ६ कोटी कर्मचाऱ्यांना  झटका बसला आहे. 

भविष्य निर्वाह निधी संघटनेने केलेल्या गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा न मिळाल्याने यंदा व्याजदर ०.१५ टक्के कमी केला आहे. २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के व्याज दिले होते.  भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी होणार असल्याने  व्याज कमी करण्याचा निर्णय  केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या वर्षभरात दीर्घ मुदतीच्या ठेवी, रोखे आणि गव्हर्न्मेंट सिक्युरिटीमधून ईपीएफओला मिळणाऱ्या उत्पन्नात ०.५० ते ०.८० टक्क्यांची घट झाली आहे.

ईपीएफओने आतापर्यंत १८ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक केली आहे. यापैकी ४५०० कोटी रुपयांची गुंतवणूक दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) आणि इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये (आयएल अँड एफएस) करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करून ईपीएफओ अडचणीत सापडली आहे. 'डीएचएफएल' सध्या दिवाळखोरी प्रतिबंधक कायद्याच्या प्रक्रियेतून आहे. तर आयएल अँड एफएसला वाचविण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. 



हेही वाचा -

लवकरच येणार वॉर्निश केलेल्या १०० रुपयांच्या नोटा

ग्राहकांसाठी नवा गुंतवणूकीचा पर्याय, आता पेटीएम काढणार विमा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा