Advertisement

हॉटेलमधील जेवण महागणार, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 'इतकी' वाढ

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका सर्व सामान्यांना बसला आहे.

हॉटेलमधील जेवण महागणार, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 'इतकी' वाढ
SHARES

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका सर्व सामान्यांना बसला आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे (LPG Gas Cylinder) नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी (OMCs) नं दिलेल्या माहितीनुसार, आजपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

२२ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती, तर व्यवसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते. मात्र आज घरगुती सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सिलिंडरचे दर वाढल्याने हॉटेलमधील जेवन महाग होण्याची शक्यता आहे.

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत स्थिर ठेवण्यात आल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये सुधारीत गॅस सिलिंडरच्या दरानुसार घरगुती गॅसची किंमत ९४९.५ रुपये आहे. तर कोलकातामध्ये ९७६ रुपये प्रति सिलिंडर इतकी आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरसाठी ९४९.५० रुपये मोजावे लागत आहेत.

तर दुसरीकडे आज व्यवसायिक गॅसच्या किमतीमध्ये तब्बल २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. व्यवसायिक गॅस सिलिंडरची किंमत प्रति सिलिंडर २,२०५ रुपयांवर पोहोचली आहे. दरवाढीपूर्वी मुंबईत व्यवसायिक सिलिंडरची किंमत १,९९५ इतकी होती. व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

PAN-Aadhaar लिंकची मुदत वाढली, पण भरावा लागेल दंड

टोपी, टी शर्टपासून परफ्यूमपर्यंत... मुंबई पोलिसांची नवी संकल्पना

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा