गोरेगाव - येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कापडनिर्मिती यंत्रांचं प्रदर्शन इंडिया टाइम 2016 नं आयोजित केलं आहे. हे प्रदर्शन 1 ते 8 डिसेंबर या कालावधीत सुरू असणार आहे.
प्रदर्शनात 5 हॉलमध्ये 1,137 स्टॉल असून 87 भारतीय, आंतरराष्ट्रीय ,राष्टीय कंपन्यांनी भाग घेतला आहे. कापड बनवायची मोठ-मोठी मशिन, त्याला लागणाऱ्या सुया, दोरा, दुरुस्तीचं साहित्य असे वेगवेगळे स्टॉल इथे आहेत. मशिनमध्ये कापड कसं बनतं, कापडाचे प्रकार, कापूस, दोरा अशा विविध प्रकारांचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळत आहे. प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.