Advertisement

सोनं पोहोचणार ३४ हजारांवर!

सध्या सोन्याचे दर ३१ हजार ८१३ रुपये प्रतितोळा (१० ग्रॅम) असून येत्या ३ ते ४ महिन्यात हा दर ३४ हजार रूपये प्रतितोळा (१० ग्रॅम) होणार आहे. या ३-४ महिन्यात गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी हे सण येत आहेत. या काळात सोन्याची मागणी वाढणार असून सोन्याचे दर आणखी वाढू शकतात.

सोनं पोहोचणार ३४ हजारांवर!
SHARES

सोन्याची खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर आताच खरेदी करून घ्या, कारण डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने येत्या काही महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सोन्याचे दर वाढणार

सध्या सोन्याचे दर ३१ हजार ८१३ रुपये प्रतितोळा (१० ग्रॅम) असून येत्या ३ ते ४ महिन्यात हा दर ३४ हजार रूपये प्रतितोळा (१० ग्रॅम) होणार आहे. या ३-४ महिन्यात गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी हे सण येत आहेत. या काळात सोन्याची मागणी वाढणार असून सोन्याचे दर आणखी वाढू शकतात.

म्हणून किंमती वाढवल्या

इतकंच नव्हे तर चांदीच्या दरातही वाढ झाली असून सध्या चांदीचे दर प्रति किलो ४० हजार ४८० रुपये आहे. काही दिवसांपूर्वी इंडस्ट्रीयल यूनिट्स आणि नाणे उत्पादकांनी केलेल्या मागणीनंतर चांदीचे दर १०० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.

त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडणार असल्यानं ग्राहकांना दर कमी असताना सोनं-चांदीमध्ये गुंतवणूक करता येऊ शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा-

२.२५ लाख शेल कंपन्या निशाण्यावर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा