Advertisement

१ जानेवारीपासून सोनं खरेदीसाठी होणार 'हा' नियम

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजे १ जानेवारीपासून सोने खरेदीचे नियम बदलणार आहेत.

१ जानेवारीपासून सोनं खरेदीसाठी होणार 'हा' नियम
SHARES

 सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजे १ जानेवारीपासून सोने खरेदीचे नियम बदलणार आहेत. या बदललेल्या नियमामुळे सोने खरेदीदारांना पूर्णपणे शुद्ध सोने मिळणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सोने आणि चांदीच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग सक्तीचे करण्यासाठी परवानगी दिली आहे. 

हॉलमार्किंग केलेले दागिने हे पूर्णपणे शुद्ध सोन्याचे असतात. सध्या ४० टक्के दागिन्यांचं हॉलमार्किंग केलं जातं. हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत सोन्याच्या दागिन्यात शुद्ध सोनं किती आणि इतर धातूंचं प्रमाण किती हे तपासलं जातं. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा दागिने उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे. तसंच सोने खरेदीदारांना शुद्ध सोनं मिळणार आहे. देशाच्या दुर्गम भागात हे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी एक वर्षांची मुदत दिली जाणार आहे. 

सोन्याचं हॉलमार्किंग करण्यासाठी देशात ४०० ते ५०० नवीन केंद्रे उघडण्यात येणार आहेत. आता देशात  हॉलमार्किंग करण्याची ७० केंद्रे आहेत. सोन्याच्या हॉलमार्किंगसाठी ग्रामीण क्षेत्रात सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. जगात भारत हा सोन्याची सर्वाधिक आयात करणारा देश आहे. भारतात दरवर्षी ७०० ते ८०० टन सोनं आयात केलं जातं. 



हेही वाचा -

काळ्या पैशात २ हजारांच्या नोटा घटल्या, 'हे' आहे याचं कारण

आधार केंद्रे आठवडाभर खुली राहणार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा